18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरनववर्षाचे हुल्लडबाजी टाळत उत्साहात स्वागत

नववर्षाचे हुल्लडबाजी टाळत उत्साहात स्वागत

लातूर : प्रतिनिधी
नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे हुल्लडबाजी असे ग्रहीत असताना लातूर जिल्ह्यात २०२५ या नववर्षाचे स्वागत उत्साहात, शांततेत करण्यात आले. कोणतीही अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही पण दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ मद्यपी वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अतिवेगान वाहन चालविणा-या ४६१ वाहचालकांवर कारवाई करून ३ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत करीत असताना काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणा-यांविरोधात लातूर पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे.
लातूर जिल्ह्याच्या २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालविणे स्वत:साठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वत: व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येते.
सदरील कारवाईत ५५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुस-याचे जिवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणा-या ४६१ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ लाख ४१ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, संबंधित पोलीस ठाण्याचे  उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, व पोलीस अमलदारानी  केली आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR