18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रनववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घट

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घट

मुंबई : नववर्षाच्या स्वागतामध्ये रमलेल्या भारतीयांसाठी पहिल्याच दिवशी सोने-चांदीने मोठी आनंदवार्ता दिली आहे. कारण वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेज आज बुधवारी, ०१ जानेवारी २०२५ ला सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ७१ हजार २४० रुपये आहे. तर, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. परंतु, २०२४ च्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या म्हणजेच मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत हे भाव कमी झाले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही.

वर्षभराचा विचार करता सोन्याने धुमशान घातले. तर गेल्या आठवड्यात सोने ६५० रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला ३० डिसेंबर रोजी सोने १६० रुपयांनी वधारले. ३१ डिसेंबर रोजी सोने ४४० रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,७१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घसरण होणार असल्याचे संकेत मिळाले. कारण नववर्षानिमित्त जागतिक बाजारपेठेतील ब-याचशा संस्था या बंद असल्याकारणाने याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR