23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरनवीन उडीद, मूगाची आवक 

नवीन उडीद, मूगाची आवक 

लातूर : प्रतिनिधी
लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात कर्नाटक बॉर्डर, उमरगा व शेजारील जिल्हयाच्या बरोबरच जिल्हयातूनही नविन मुग, उडीद या शेतमालाची विक्रीसाठी आवक होत आहे. मुग, उडीद शेतमालास सरासरी ७ ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. यावर्षी पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस होत असल्याने शेतमालास चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या अनुमानानुसार यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने खरीप हंगामातील पेरण्याही लवकर झाल्या. लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिली मिटर पाऊस पडतो. तो आज पर्यंत जिल्हयात ५६७.२ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्यामुळे जिल्हयात आजर्यंत ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. या मध्ये ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ७१ हजार ४७५ हेक्टर, मूग ७ हजार १४१ हेक्टर, उडीद ५ हजार ९४४ हेक्टर, ज्वारी ३ हजार ८२७ हेक्टर, बाजरी २०९ हेक्टर, मका २३ हजार ७०८ हेक्टर, भात ३७ हेक्टर, भुईमुग १७३ हेक्टर, तीळ १४७ हेक्टर, कारळे ५८ हेक्टर, सुर्यफूल २८ हेक्टर पेरणी झाली आहे. तर कापूस १ लाख ६२ हजार ३८८ हेक्टरवर लागवड झाली आहे.
जिल्हयात सध्या मुग व उडीद या पिकांची काढणी सुरू आहे. तसेच काढणी व मळणी झालेल्या नविन मुग व उडीद या शेतमालाची आवक लातूरच्या आडत बाजार पेठेत होत आहे. या सोबतच लातूर जिल्हयाच्या सिमार्ती भागा लगत असलेल्या अंध्र, कर्नाटक राज्याच्या बरोबरच इतर जिल्हयातूनही मूग, उडीदाची आवक होत आहे. यावर्षी मूग व उडीदाचे पिक चांगले आल्याने येणा-या कालावधीत मूग व उडीदाची आवकही वाढणार आहे. आडत बाजारात मुगाची ४३७ क्विंटल आवक होऊन सर्वाधिक ७ हजार ८०० रूपये दर मिळाला. तर १३० क्विंटल उडीदाची आवक होऊन सर्वाधिक ८ हजार ८०१ रूपये दर मिळाला आहे. यावर्षी पावसाने साथ दिल्याने पिकांची चांगली वाढ झाली असून उत्पादनही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR