22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeलातूरनांदेड एटीएसचा लातुरात ‘नीट’ नेम बसलाच नाही!

नांदेड एटीएसचा लातुरात ‘नीट’ नेम बसलाच नाही!

लातूर : विनोद उगीले
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले असल्याच्या संशय नांदेड एटीएस पथकाला आला. त्यांनी लातूरातील दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांना घरी सोडून ही दिले आहे. असे असताना त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणारे नांदेड एटीएस पथक याप्रकरणी स्पष्टता न देता या माध्यमातून प्रसिध्द झालेल्या वृत्तात सत्यता नसल्याचे सांगत आहे. यावरून याप्रकरणी नांदेड एटीएसच्या पथकाचा नेम नीट बसला नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
  देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या व संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटी प्रकरणी परवा नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात केली आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या  शिक्षकांना ताब्यात घेऊन लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया नेऊन त्यांच्या मोबाईल तपासणी व बँक खाते व अदी चौकशी करून त्यांना घरी नेऊन सोडले. तसा दावा ही ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा पैकी एक असलेल्या शिक्षक जलील उमरखाँ पठाण यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले  आहे.  एकदंरीत पाहता ज्या तयारीने नांदेड एटीएस पथक लातूरात दाखल झाले होते ते पाहता याप्रकरणी त्यांचा नेम हा नीट बसला नसल्याचेच दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR