23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरात रविवारी मंत्रिमंडळ विस्तार

नागपुरात रविवारी मंत्रिमंडळ विस्तार

राजभवनात दुपारी पार पडणार शपथविधी
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला वेग आला असून, १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा शपथविधी होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली आहे. आता मुख्यमंत्री स्वत: या सर्वांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण देणार आहेत.

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस काही जुन्या चेह-यांना वगळून नव्यांना स्थान देणार असल्याचे समजते. १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडत आहे. मात्र या मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी कोणा-कोणाच्या गळ््यात मंत्रिपदाची माळ पडणार, कोणाला यंदा डच्चू मिळणार हे उद्याच्या शपथविधी सोहळ््यात पाहायला मिळणार आहे. या शपथविधी सोहळ््यात एकूण ४० जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी ५०० लोक उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच या शपथ विधीमध्ये नागपूर जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

या सोहळ््यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. यावेळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार असून शिंदेंच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणीदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिंदे लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करणार आहेत, असे सांगण्यात आले. मंत्रिमंडळात भाजपधून ब-याच तरुण चेह-यांना संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेत तानाजी सावंत, दीपक केसरकर, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांना वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, संजय सिरसाट, विजय शिवतारे शपथ घेऊ शकतात. राष्ट्रवादीतह हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे यांना वगळण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक यांच्यासह अनिल पाटील, अदिती तटकरे यांना संधी मिळू शकते.

बावनकुळेंकडे महसूल खाते?
सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. गृह खाते हे भाजपकडेच राहणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच ते कायम राहणार असल्याचे समजते.

शिवसेनेकडे नगरविकास,
गृहनिर्माण खात्याची धुरा
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास याबरोबरच गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात येणार असून, उद्योग खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे.

अर्थ खाते राष्ट्रवादीकडे
भाजपने अर्थ खात्याचा आग्रह सोडला असून ते पूर्वीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच असेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे मदत व नियोजन, पुनर्वसन याबरोबरच उत्पादन शुल्क खात्याचीही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR