21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये भीषण अपघातात ३ ठार

नागपूरमध्ये भीषण अपघातात ३ ठार

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केळवद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या पांढुरणा भागे येथील महिरी शिवारात सोमवारी १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. केळवद पोलिस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. काटोलला जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मेव्हण्याचा मृत्यू झाला आहे. शिवाजी परासराम शिरसाम, ललित शिवारी शिरसाम, अनिल इवनाथ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी रुग्णावाहिकेला बोलवून घेतले. त्यानंतर स्थानिकांनी तिघांना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले. स्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR