23.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमहाराष्ट्रनामदेव शास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला; जरांगेंचा थेट निशाणा

नामदेव शास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला; जरांगेंचा थेट निशाणा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे महंत नामदेव शास्त्रींच्या भेटीला गेले. धनंजय देशमुखांचा वैयक्तिक विषय आहे. महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले. नामदेव शास्त्री आरोपींचे समर्थन करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपलं बघावं दुस-याकडे डोकावून पाहू नका. स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचे काम झाले आहे. जातीय सलोखा बिघडला. याबाबतीत जायला नको पाहिजे. पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले, खंडण्या गोळा करणे, जातीयवादाचा नवा अंक भयंकर आहे. जातीयवादाचा चौथा नवीन अंक राज्याला पाहायला मिळाला आहे.

तुला रक्त पट्टी दिसली, सलाईन पाहून मरावा वाटला असे तुमचे वक्तव्य आहे. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन-अडीच महिने कोणाला दिसले नाही. नाटकाचा हा चांगला अंक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांनी आणखी तरी माझ्या नादाला लागू नये, समजून घ्या, शाने व्हा, मला खेटू नका,असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत
जातीचा विश्वासघात केल्यावर मी मागे लागत असतो. दिल्लीकडून दखल घेतली जात असेल तर आम्ही वाट बघतोय. सर्व मराठा एकत्र आहे. खूप दशकांनंतर मराठा एकत्र आला आहे. मराठा समाजासाठी मला जसं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईन, असे मनोज जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR