23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरनालीचे काम अर्धवट, पाणी रस्त्यावर

नालीचे काम अर्धवट, पाणी रस्त्यावर

लातूर : प्रतिनिधी
विवेकानंद चौकाकडून शाहूनगर संत गोरोबा सोसायटी इंदिरानगरकडे जाणारा मुख्य रस्ता लगत हवेच्या बाजूची नाली हायवे गुत्तेदाराने अपुरी ठेवून अर्धवट काम केलं आहे.  विवेकानंद चौकाकडून बाभळगाव नाक्याकडे जाणा-या मुख्य हायवे रस्त्याच्या बाजूला एक्सेस एटीएमच्या समोरील ५० फुटांची नाली गुत्तेदारांनी न करता ठेवली आहे. यामुळे पूर्ण नालीचा घाण पाण्याचा पावसाळयात रस्त्यावर येऊन दुर्गंध साचत आहे.
 यामुळे येथील नागरिकांना मोठया गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. तरी याबद्दल या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस प्रभाग क्रमांक ३ चे अध्यक्ष, सर्व व्यापारी बांधवांच्या विनंतीवरून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या नालीचं काम लवकरात लवकर करून नाही घेतल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन उभा करण्यात येईल, अशा या मागणीचे निवेदन संत गोरोबा सोसायटी चेअरमन काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष विकास कांबळे यांनी मनपा आयुक्तांना दिले. यावेळी अजय आडगळे व व्यापारी बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR