25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

नागपूर : प्रतिनिधी
४ जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या त्यांच्या रोखठोक सदरातून हे भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, नितीन गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असे त्यांनी सांगितले.

तसेच जे गडकरींच्या बाबतीत तेच योगींचे, अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे योगी को बचाना है, तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपाच्या ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शाह यांना घालवा असं उत्तरेकडील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलं. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

राऊतांचे आरोप निराधार
नितीन गडकरी हे देशातील सर्वमान्य नेतृत्व आहे. कुठल्याही पक्षाचा खासदार असेल तर त्यांनी गडकरींच्या कामाचं कौतुक संसदेत केले आहे. गडकरींच्या पाठीशी मोदी-शाह आहेत म्हणून तर ते देशात पायाभूत सुविधा रस्ते विकास करू शकले. त्यामुळे रोज उठायचं आणि खोटे बोलायचे असे राऊतांचे आहे. त्यांनी केलेला आरोप निराधार आहे. असं सांगत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR