29.4 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरनिलंगा तालुक्यात दोन बसेसच्या काचा फोडल्या

निलंगा तालुक्यात दोन बसेसच्या काचा फोडल्या

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा आगाराची एस टी ही निलंग्याहून किल्लारीकडे प्रवाशी वाहतूक करीत असताना अज्ञात व्यक्तींनी बसवर दगड मारून काच फोडला तसेच कर्नाटक बसवरही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून काच फोडल्याची घटना निलंगा परिसरात घडली आहे. निलंगा आगाराची एम एच २० बी एल २५४४ ही एस टी निलंगा आगारातून किल्लारीकडे निघाली असता नणंद रोडवर ४.३० दरम्यान या बसवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून काच फोडली.
 याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात चालक अनंत चव्हाण व  वाहक भरत काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कर्नाटक डेपोची लातूर-भालकी ही बस लातूर-बिदर रोडवर बसवेश्वर मंगल कार्यालया जवळ दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आली असता अज्ञातांनी दगडफेक करून या काच फोडली. याबाबत  निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR