22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरनिलंगा तालुक्­यात नवीन ४ जी ई-पॉस मशीनचे वाटप

निलंगा तालुक्­यात नवीन ४ जी ई-पॉस मशीनचे वाटप

निलंगा  : प्रतिनिधी
महाराष्­ट्र शासनाच्­या अन्­न  व नागरी पुरवठा विभागामार्फत  राज्­यातील सर्व रास्­त भाव दुकानदार यांना नवीन ईपॉस मशीन वाटपाच्­या नवीन धोरणानुसार निलंगा  तालुक्­यातील एकूण १९३ रास्­त भाव दुकानदार यांना नवीन ४ जी ईपॉस मशीनचे वाटप तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्­या हस्­ते करण्­यात आले.
निलंगा तालुक्­यात एकूण १९३ रास्­त भाव दुकानदार  असून त्­यांना यापुर्वी २ जी ईपॉस मशीनचे वाटप करण्­यात आले होते. सदर मशीन कालबाहय झाल्­यामुळे व धान्­य वाटपाच्­या  वेळी व्­यवस्थित प्रतिसाद मिळत  नसल्­यामुळे महाराष्­ट्र शासनाच्­या अन्­न व नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन ४ जी  ईपॉस मशीन पुरविण्­यात आल्­या आहेत. सदर प्राप्­त मशीनचे प्रात्­यक्षिक जिल्­हाधिकारी कार्यालयाचे ईपॉस मशीनचे जिल्­हा कोऑर्डीनेटर येरोळकर व त्­यांचे सहकारी .ंिसदाळकर यांनी सर्व रास्­त भाव  दुकानदारांंना देऊन नवीन मशीन मध्­ये कोणते बदल  करण्­यात आले  असून त्­याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
सदर मशीनमध्­ये आता दोन इनबील्­ट सीम कार्ड देण्­यात आले असून सदर सीमकार्ड हे अ‍ॅटोमॅटीकरित्­या नेटवर्क प्राप्­त करण्­यास सक्षम सांगीतले तसेच सदर  मशीनमध्­ये आता  पुर्वीप्रमाणेच बायोमॅट्रीक पध्­दतीने, ओटीपी
पध्­दतीने धान्­य वितरीत होणार असून ज्­यांच्या हाताचे ठसे  उमटत नसल्­यामुळे  बायोमॅट्रीक पध्­दतीने धान्­य उचलता येत नव्­हते त्­यांच्यासाठी डोळयाच्­या  बुबळाचे स्­कॅंिनग करुन धान्­य वितरण करण्­याची सुविधा सदर नवीन मशीनमध्­ये उपलब्­ध करुन देण्­यात आल्­याची माहितीही संबंधिताने सर्व रास्­त भाव  दुकानदार यांना दिली.
    या  प्रसंगी तहसीलदार .प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व रास्­त भाव  दुकानदारांना मार्गदर्शन करुन नवीन मशीनमधील बदल  समजावून घेवून त्­याप्रमाणे धान्­याचे वाटप करावे असे  आवाहन केले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार. प्रविण आळंदकर, रास्­त भाव  दुकानदारांचे जिल्­हा अध्­यक्ष सुधाकर पाटील, पुरवठा विभागाचे अवल कारकून बालाजी शिंदे, महसूल सहायक  माधव कार्लेकर, तालुक्­यातील सर्व रास्­तभाव दुकानदार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR