22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeलातूरनिलंगा येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा घंटानाद

निलंगा येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा घंटानाद

निलंगा : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स या केंद्रीय संस्थेच्या गैरवापराबाबत निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने घंटानाद आंदोलन करून विविध मागण्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले .
केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्था ईडी, सीबीआई, इन्कम टॅक्स या केंद्र सरकारच्या संस्थामार्फत विरोधी पक्षातील नेत्यांना विशिष्ठ लक्ष करुन सुडाचे राजकारण सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी व नविन नोकरी उपलब्ध करण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारी या मुद्याला बगल देऊन केंद्र सरकारच्या मदतीने जाणीवपुर्वक पक्ष फोडण्यात व नेत्यांना टार्गेट करीत राजकारण करण्यात सध्याचे केंद्र व राज्य सरकार व्यस्त आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निलंग्यात घंटानाद आंदोलन करून सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या.
 यात सुडबुध्दीने होणारे कारवाई त्वरित थांबवाव्या , महिला सक्षमीकरणासाठी शक्ती कायद्याची त्वरीत अंबलबजावणी करावी , पेपर फुटी वर मजबुत कायदा करावा ,कंत्राटी भरती त्वरीत रद्द करावी , विद्यार्थीचे शैक्षणिक कर्जावरील व्याज तात्काळ माफ कराव्यात , सर्व परिक्षा करिता एमपीएसी मार्फत घेण्यात यावा , शेतक-यांना अवकाळी व दुष्काळी अनुदान वेळेत पंचनामे करुन तात्काळ वितरीत कराव्यात , मराठा, धनगर आरक्षणावरील सर्व त्रुटी दुर करुन लवकर आरक्षण लागु करावे आदी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना देण्यात आले.
    यावेळी जल्हिाउपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे, इस्माईल लदाफ, विलास माने, सुधीर मसलगे,  लक्ष्मण कांबळे, महेश चव्हाण, अंगद जाधव, सुग्रीव सूर्यवंशी, लक्ष्मण क्षीरसागर, धोंडीराम वाघमारे, मोहन माने, इफरोज शैख, ंिलबराज बिराजदार, समीउलला कादरी, मुसा पठाण, राजेश माने, निजाम शैख, अलीम फारुकी, मारुतीराव गायकवाड, नाजिर शैख, प्रविण कवटकर, जहांगीर फकीर, शंकर बनसोडे, बालाजी शिंदे, नसीम तांबोळी , विकास ढेरे, विकास शिंदे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR