निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहरासह तालुक्यातील गावागावात मराठा समाजााला ओबीसीतून आरक्षण दिल्याचा जल्लोष फटाके फोडून आतीष बाजी करत पेढे वाटून ढोल ताशेच्या गजरात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साजरा केला . महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून अनेक अंदोलन सुरु होती.
नवी मुंबई येथील वाशीमध्ये शनिवारी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देण्याचा अध्यादेश दिल्यानंतर निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आतीष बाजी करत घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. तर तालुक्यातील औराद शहाजानी, केळगाव, तगरखेडा सावरी, शेळगी, मानेजवळगा, हलगरा, हालसी, बोरसुरी, ताडमुगळी, कलमुगळी, माळेगाव आदी गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जल्लोष करण्यासाठी सकल मराठा समाजाचे हरिभाऊ सगरे, अजय जाधव, दत्ताभाऊ ढाले, सुरज शिंदे अॅड. गोपाळ इंगळे, मंगेश गाडीवान, सतीश भोपी आदीसह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.