25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणूक आयुक्तांची नियुक्ती, नवीन कायद्याला स्थगितीची मागणी

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, नवीन कायद्याला स्थगितीची मागणी

याचिकेवर सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयात आज निवडणूक आयुक्त कायद्याला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील सुनावणी झाली. सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणा-या निवड समितीमधून काढून टाकणा-या नवीन कायद्याला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी केली आहे. आता ही मागणी करणा-या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा २०२३ विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांना पॅनलमधून काढून टाकण्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत सरन्यायाधीशांना पुन्हा पॅनलमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.

न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर काँग्रेस नेत्या जया ठाकूर, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि इतरांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायद्यातील विविध तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान देणा-या रिट याचिकांवर सुनावणी केली. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची गुरुवारी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR