33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरनिसर्ग शाळा सह्याद्री देवराई येथे फुलपाखरे, मधमाश्यांचे ऋण व्यक्त

निसर्ग शाळा सह्याद्री देवराई येथे फुलपाखरे, मधमाश्यांचे ऋण व्यक्त

लातूर : प्रतिनिधी
येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशालेच्या जवळपास दिडशे विद्यार्थिनी ३ बसेस व इतर वाहन करुन सह्याद्री देवराई झरी-रामवाडी तालुका चाकुर हा प्रकल्प पाहण्यासाठी दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी गेल्या होत्या. या विद्यार्थीनी आणि सह्याद्री देवराई प्रकल्पाचे तसेच वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, स्वयंसेवकांनी निसर्ग शाळेत फुलपाखरे, मधमाश्यांचे ऋण व्यक्त केले. निसर्ग शाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी, पर्यावरण प्रेमी स्वयंसेवकांनी फुलपाखरे, मधमाश्या, वृक्षवेली, पक्षी, प्राणी, सुर्य, पाणी, हवा, पृथ्वी, आकाश यांचे ऋण व्यक्त करणारी प्रार्थना सामुहीक पणे घेतली. रामवाडी, झरी खुर्द, जानवळ यांच्यामध्ये असलेल्या तीन बोडक्या डोंगरावर ४३ हजार पेक्षा जास्त वृक्ष डोंगर उतारावर माध्यापासून पायथ्यापर्यंत आडवे समतोल चर मारुन पावसाच्या पाण्यावर जगवण्यात आली आहेत. २०१८ साली सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या देवराईची सुरुवात वनविभागाच्या सहकार्याने करण्यात आली. २०१९ साली सयाजी शिंदे यांनी या ४०० वर्ष वयाच्या वडाच्या झाडाखाली निसर्ग शाळा सुरु केली. त्यावेळी त्यांच्या हस्ते अनेक वृक्ष लावले.

शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाप्रती संवेदना वाढव्यात, नुसते झाड नाहीत तर या पृथ्वीवरील अन्न साखळीतील सर्व घटकांची माहिती मिळावी म्हणून ही निसर्ग शाळा गेल्या ४ वर्षापासून राबविली जात आहे. जीवन प्रवास करत असताना झाडांचे ऋण व्यक्त्त करण्यासाठी सकाळी सुर्योदयाच्या वेळी श्रीमती गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या १५० विद्यार्थीनींनी या निसर्ग शाळेत सहभाग घेतला. शालेय समितीच्या अध्यक्षा कुमुदिनी भार्गव, मुख्याध्यापिका संगीता कासार, निरीक्षक अचला कदम यांनी वेळोवेळी पर्यावरण उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. या विद्यार्थींनी तीन बसमध्ये सकाळी लातूरहून देवराईकडे रवाना झाल्या. तेथे पोहचल्यावर श्रमदान करुन वृक्षारोपण केले. विविध दहा लिटरच्या कॅनमध्ये आणलेले पाणी देण्यात आले. नंतर डोंगर पायथ्यापासून माथ्यापर्यंत जवळपास तीन किलोमीटर फिरुन या देवराईच्या वृक्षांची वेलींची, झुडपांची, गवताची, पाण्याच्या विविध बंर्धा­यांची, परिसरातील जल व्यवस्थापनाची माहिती घेतली.

या उपक्रमासाठी सह्याद्री देवराईचे रामवाडीचे सरपंच माधव नागरगोजे, अभय मिरजकर, संग्राम नागरगोजे, सविता झापंले, वन परीमंडल अधिकारी चाकुर एस. एस. म्हस्के, अमोल सुर्यवंशी, श्रीमती गोदावरीदेवी कन्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुनिता बोरगांवकर, सहल प्रमुख आशा लोंढे, शिक्षक प्रतिनिधी कमल खिंडे, माया दुधारे, गायत्री ठाकूर, लक्ष्मी कपाळे, सेवक भागवत रंकाळे, लखन पांचाळ सह्याद्री देवराईचे स्वयंसेवक हे उपस्थित राहुन निसर्ग शाळा उपक्रमासाठी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR