16.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeसोलापूरनेताजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले बहारदार कलाविष्कार

नेताजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले बहारदार कलाविष्कार

सोलापूर (प्रतिनिधी )

नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन ,मोरया मोरया, मेरे मन मे शिवा,माऊली माऊली, कोळीगीत, पोवाडा, लावणी, भजन, राजस्थानी लोकगीत, गुजराती लोकगीत, शिवतांडव, श्रीकृष्ण महिमा, मूकनाट्य, चित्रपट गीत,देशभक्तीपर गीत आदी विविध मराठी, हिंदी, तेलुगू गाण्यावर बहारदार नृत्य व नाटक सादर करुन पालकांची मने जिंकली.

सोमवारी, हुतात्मा स्मृती मंदिर येथे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष श्रावण बिराजदार,संस्थेचे लेखा परीक्षक महेश आळंगे,मनपा केंद्रप्रमुख स्वप्निल चाबुकस्वार, सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले,अंबादास चाबुकस्वार,लक्ष्मीकांत त्रिशूले, रत्नमाला उकरंडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा मनीषा हबीब, सहसचिव उमेश मायकुंटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.

प्रथम मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या स्नेहसंमेलनात इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या ३४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन उमादेवी कुंभार व जयश्री बिराजदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली इंडे,भाग्यश्री महाजन, विजयालक्ष्मी माळवदकर,प्रकाश कोरे,विठ्ठल कुंभार,शिवकुमार शिरुर, सिद्धाराम कुंभार,विनायक कोरे, सूर्यकांत बिराजदार,अशोक पाटील,काशिनाथ माळगोंडे व गणपती पाटील, बसवराज सावळतोट, मच्छिंद्र बिंदगे, परमेश्वर दोड्याळ व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR