25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमुख्य बातम्यानेत्यांच्या फितुरीमुळे रॉ एजंटांचे हत्याकांड

नेत्यांच्या फितुरीमुळे रॉ एजंटांचे हत्याकांड

‘इंडिया टीव्ही’वर प्रदीप सिंह यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी केला आहे. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत भारतातील नेत्यांनी पाकिस्तान आणि इराणला भारतीय एजंटची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.

रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग ही भारताची विदेशात गुप्त माहिती काढणारी गुप्तचर संस्था आहे. त्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी ‘रॉ’कडून एजंट नियुक्त केले जातात. ही माहिती अत्यंत गोपनीय असते. देशातील कोणताही जबाबदार नेता किंवा अधिकारी ही माहिती इतर देशांना देणार नाही. परंतु भारतीय नेत्यांनी पाकिस्तान आणि इराणला ही माहिती दिली. वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी दावा केला की, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी ही माहिती इराण आणि पाकिस्तानला दिली. अगदी त्या देशात कोणता एजंट कोणत्या भागात काय नावाने राहतो, अशी सर्व माहिती दिली गेली. त्यामुळे भारतातील त्या देशातील सर्व ‘रॉ’ एजंट मारले गेले.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तर पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल भारतीय एजंटांनी मोठ्या कष्टाने मिळवलेली संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना सांगितली होती. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानात कार्यरत असलेल्या भारताच्या सर्व एजंटांना आयएसआयने मारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR