20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयन्यायव्यवस्था धोक्यात?

न्यायव्यवस्था धोक्यात?

५०० हून जास्त वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र विशिष्ट गटांच्या राजकीय-व्यावसायिक दबावापासून संरक्षण हवे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांच्यासह ५०० हून अधिक ज्येष्ठ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. न्यायव्यवस्था धोक्यात आहे आणि राजकीय आणि व्यावसायिक दबावापासून संरक्षण करणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे.

न्यायालयीन अखंडता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वकिलांनी लिहिले. कायदा टिकवून ठेवण्याचे काम करणारी माणसे आहोत. न्यायालयाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असा आमचा विश्वास आहे. आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे. छुप्या पद्धतीने हल्ल्ले करणा-यांच्या विरोधात बोलण्याची वेळ आली आहे. न्यायालये लोकशाहीचे आधारस्तंभ राहतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. या विचारपूर्वक केलेल्या हल्ल्यांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ नये.

२६ मार्च रोजी लिहिलेले पत्र
‘आदरणीय सर, आम्ही सर्वजण आमची मोठी चिंता तुमच्याशी शेअर करत आहोत. एक विशिष्ट गट न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट न्यायालयीन व्यवस्थेवर प्रभाव टाकत आहे आणि आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी उथळ आरोप करून न्यायालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यांच्या या कतींमुळे न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य असलेले सौहार्द आणि विश्वासाचे वातावरण बिघडत आहे. राजकीय बाबींमध्ये दबावाचे डावपेच सामान्य आहेत, विशेषत: ज्या प्रकरणांमध्ये राजकारणी भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हे डावपेच आपल्या न्यायालयांचे नुकसान करत आहेत आणि लोकशाही रचनेला धोका निर्माण करत आहेत.

हा विशेष गट अनेक प्रकारे कार्य करतो. ते आपल्या न्यायालयांच्या सोनेरी भूतकाळाचा संदर्भ देतात आणि त्यांची आजच्या घटनांशी तुलना करतात. निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी न्यायालये धोक्यात आणण्यासाठी ही केवळ जाणीवपूर्वक केलेली विधाने आहेत.
काही वकील दिवसा राजकारण्याचा खटला लढतात आणि रात्री प्रसारमाध्यमांसमोर जातात, त्यामुळे निर्णयावर प्रभाव पडू शकतो, हे पाहणे अस्वस्थ करणारे आहे. ते बेंच फिक्सिंगचा सिद्धांतही तयार करत आहेत. ही कृती केवळ आपल्या न्यायालयांचाच अनादर नाही तर बदनामीही करणारी आहे. हा आपल्या न्यायालयाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे.

माननीय न्यायाधीशांवरही हल्ले होत आहेत. त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ते इतके झुकले आहेत की ते आमच्या न्यायालयांची तुलना त्या देशांशी करत आहेत जिथे कायदा नाही. आमच्या न्यायव्यवस्थेवर अन्यायकारक कारवाईचा आरोप केला जात आहे.

२ मुद्यांचा विशेष उल्लेख

१. राजकारण्यांचे दुहेरी चारित्र्य : राजकारणी एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि नंतर त्यांना वाचवण्यासाठी न्यायालयात जातात हे पाहून आश्चर्य वाटते. कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने गेला नाही तर ते कोर्टातच कोर्टावर टीका करतात आणि नंतर मीडियापर्यंत पोहोचतात. हे दुटप्पी चारित्र्य म्हणजे सामान्य माणसाच्या आपल्याबद्दल असलेल्या आदराला धोका आहे.

२. बॅकबिटिंग आणि खोटी माहिती :
काही लोक सोशल मीडियावर त्यांच्या केसशी संबंधित न्यायाधीशांबद्दल खोटी माहिती पसरवतात. त्यांच्या खटल्यातील निर्णयावर त्यांच्या पद्धतीने दबाव आणण्यासाठी ते असे करतात. हे आमच्या न्यायालयांच्या पारदर्शकतेला धोका आहे आणि कायदेशीर तत्त्वांवर हल्ला आहे. त्यांची वेळही ठरलेली असते. देश निवडणुकीच्या तोंडावर असताना ते हे करत आहेत. २०१८-१९ मध्येही ही गोष्ट आपण पाहिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR