23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeलातूरन्यायालयीन प्रक्रीयेनंतर सीबीआय अ‍ॅक्शन मोडवर

न्यायालयीन प्रक्रीयेनंतर सीबीआय अ‍ॅक्शन मोडवर

लातूर : प्रतिनिधी
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचल्याने देशभरात चर्चेला आलेल्या लातूरात शनिवारी व रविवारी दाखल झालेल्या सीबीआय पथकाने सोमवारी सकाळी न्यायालयाकडे हा बहुचर्चित गुन्हा व त्याचा तपास सर्वोच्य न्यालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीची याचिका दाखल केली. यावर न्यायाल्याने सीबीआयची ही याचीका मान्य करत तशी त्यांना परवानगी दिल्यानंतर सीबीआय लातूरात अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे सोमवार दिवसभरात दिसून आले आहे.
लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार संजय जाधव व जलीलखॉ पठाण या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील  चार संशयीत आरोपींपैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर ईरन्ना मष्णाजी कोनगलवार हा आपल्या कुटूंबासह फरार आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.  असे असतानाच शनिवार रोजी रात्री उशिरा व रविवारी रात्री असे दोन सीबीआय पथक  लातूरात दाखल झाल होते. या पथकाने सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लातूर न्यायालयात दाखल होत सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा व या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कोठडीत असलेल्या संशयीत आरोपीना सीबीआयकडे देण्यात यावेत, अशी याचिका दाखल केली व न्यायालयाने यावर सुनावणी घेऊन याला परवानगी दिली.
यानंतर सीबीआय लातूरात अ‍ॅक्शन मोडवर आली.  न्यायालयातून बाहेर पडलेल्या या पथकाने अशोक हॉटेल चौकातून युटर्न घेत थेट जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कार्यालय गाठून येथे जवळपास दीड तास थांबून या पथकाने यागुन्ह्यासंबधी आवश्यक ती माहिती व कागदपत्रे हस्तगत करुन शहरातील अंबाजोगाई रोड व बार्शी रोडवरील भागात जाऊन  काही जणांची चौकशी केल्याचे समजते. तर रात्री उशिरापर्यंत सीबीआय पथक उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे कार्यालयात ठाण मांडून या प्रकरणाचा तपास करीत होते असे ही समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR