इचलकरंजी : येथील संग्राम चौक परिसरात पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा गळा आवळून खून केला. करिश्मा किसन गोसावी (वय २५) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी पहाटे ५.२५ वाजता घडली.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.
समोर आलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी संकुलात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या रामजन्मभूमी संकुलातील आहे.