29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeनांदेडपतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने प्राण सोडला

पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने प्राण सोडला

नांदेड : प्रतिनिधी
‘जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा’ हे म्हणणे काही खोटे नही विष्णुपुरी ता. नांदेड येथे विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या एक कर्मचारी यांचे मूळ गाव बेंद्री ता.नायगाव येथे दुचाकीवरून शनिवारी सायंकाळी जात होता. मांजरम जवळ अपघात झाल्यामुळे तो जागीच ठार झाला याची खबर पत्नीला समजतात घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली.

विष्णुपुरी येथे विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेला अरुण बाबुराव पाटील हे शनिवारी रात्री नांदेड येथून बेंद्रीकडे दुचाकीवरून जात होते मांजरम जवळ त्यांचा अपघात झाला या अपघातात अरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने नांदेडला नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पतीच्या अपघाताचे वृत्त कळताच अरुण यांची पत्नी स्रेहा कुटुंबियांसह पतीला भेटण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आली होती. अरुण यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत त्यांना बेंद्री येथील घरी पाठवले. मात्र, अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्रेहा यांना लागली होती. हे दु:ख त्यांना सहन झाले नाही. या घटनेच्या त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. या दु:खाच्या आणि निराशेच्या भरात त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेत जीवनयात्रा सपंवली.

स्रेहा यांनी आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. काही वेळापूर्वीच पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासातच पत्नीने गळफास घेत आयुष्य संपविले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावात शोककळा पसरली आहे. मृत अरुण व स्रेहा यांना तीन वर्षाचे एक अपत्य असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR