22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
HomeUncategorizedपरभणीच्या खेळाडूंनी पटकावले १० सुवर्ण पदक

परभणीच्या खेळाडूंनी पटकावले १० सुवर्ण पदक

परभणी : राष्ट्रीय रोलर म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा दिल्ली येथील त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातून ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. परभणीचे एकूण ६ खेळाडूंचा त्यामध्ये सहभाग होता. या खेळाडूंनी वेगवेगळ्या गटामध्ये १० सुवर्णपदक, ४ रोप्य पदक व ६ कास्य पदक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे.

या स्पर्धा इंटरनॅशनल स्पोर्ट्स पॅथलॉन व इंडिया रोलर म्युझिकल चेअर फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कल्पेश  थोरवत सुवर्ण, भीमराज टोमके २ सुवर्ण, कौस्तुभ चव्हाण ३ सुवर्ण, १ सिल्वर, पार्थ कठाळे १ सुवर्ण, २ सिल्वर, व्यंकटेश टोमके १ गोल्ड, १ ब्राँझ, रुद्र बैनवाढ ४ ब्रास मेडल असे भरघोस पदकाची कामगिरी केली.

या सर्व खेळाडूला मार्गदशक म्हणून तुकाराम ठोंबरे, राजा सचिव  व खा. संजय जाधव, आ. मेघना बोर्डीकर, परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी ठोंबरे व महाराष्ट्राचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, टेक्निकल डायरेक्टर शिवाजीराव चव्हाण, इंडिया सेक्रेटरी विदेशी राजपूत यांनी सर्व खेळाडूला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR