22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeपरभणीपरभणीत २२ पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

परभणीत २२ पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

परभणी : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणा-या २२ पानटपरीधारकांवर कोटपा कायद्यांतर्गंत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २२ पानटपरी चालकांकडून ८ हजार ७०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली १८ जून रोजी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. कोटपा कायदा २००३ कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखू-गुटखा खाणे व बाळगणे याविरोधी कायदा आहे. कलम ५ नुसार, तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करण्यावर बंदी असून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि वापरामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते तसेच विविध साथीचे रोग पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे कारेगाव रोड, खानापूर फाटा, वसमत रोड आणि नवा मोंढा परिसरामध्ये कोटपा कायदा कलम ४ चे उल्लंघन करणा-या २२ पानटपरीधारकांविरोधात ही कारवाई करत ८ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. रुपाली रणविरकर, मानसतज्ज्ञ केशव गव्हाणे, नवा मोंढा पोलीस ठाणे प्रतिनिधी होमगार्ड गणेश खुणे, सुनिल अहिरे, चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अनंता सोगे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड तसेच आर्यनंदी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अभिजित संघई यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR