परभणी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते परभणी लोकसभा सहसमन्वयकपदी अस्थिरोग तज्ञ डॉ. केदार खटींग यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आ.मेघना साकोरे बोर्डीकर, भाजपचे परभणी लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम, भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपचे परभणी महानगराध्यक्ष राजेश देशमुख, भाजपा जिल्हासरचिटणीस अर्जुन बोरुळ, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष आनंत बनसोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकणुर, युवा नेते बाळासाहेब भालेराव, शासकीय गुत्तेदार अंबादास घोडके, विधानसभा प्रमुख कृष्णाजी सोळंके, भाजपचे उपाध्यक्ष निहाल शेख, शिवाजी बोचरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीमुळे परभणी जिल्ह्यात सर्वत्र डॉ. खटींग यांचे अभिनंदन होत आहे.