16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीपर्यावरणाचे निरंतर संवर्धन करणे गरजेचे : चव्हाण

पर्यावरणाचे निरंतर संवर्धन करणे गरजेचे : चव्हाण

परभणी : पर्यावरण दिनाची केवळ औपचारिकता न बाळगता पर्यावरणाचे निरंतर संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात केल्यास -हास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आत्मा प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी केले.

५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग परभणी व शिवकृषक अग्रो प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथे विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वनक्षेत्रपाल श्रीमती प्राची बिसेन, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, वनपाल पांडुरंग कोल्हे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, हवामान बदलामुळे शेती देखील बदलत आहे त्यातच रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकताही कमी होत आहे. यासाठी जमिनीची सूपिकता वाढविण्यासाठी शेंद्रीय खतांचा उपयोग करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांनी हवामान बदलामुळे शेतीच्या हंगामावर परिणाम होत असून या परिणामाला सामोरे जाण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वनक्षेत्रपाल प्राची बिसेन यांनी भौतिक वस्तूंचा अतिवापर वाढल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण पूरक जीवनशैली, वृक्षांची लागवड, परिसर स्वच्छता बाळगण्याची गरज व्यक्त केली. वनपाल पांडुरंग कोल्हे यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही तर त्या वृक्षांची सातत्याने जोपासना केली पाहिजे तसेच शेतीत शेतीत रासायनिक रासायनिक खताचा खतांचा वापर कमी केला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे शेतक-यांनी वळलं पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पर्यावरणाच्या पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती दिली.

यावेळी अटलबिहारी वाजपेयी, आंतरराष्ट्रीय जि.प. शाळा बोरगाव येथे विद्यार्थ्यांची पर्यावरणाविषयी पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पारितोषिके देण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थी यांच्यामध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आभार शिव शिवकृषक अ‍ॅग्रो लिमिटेडचे सचिव सुरेश केंदळे यांनी तर सूत्रसंचलन विशाल दलाल यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR