15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकने घेतली प्रक्षेपणास्राची चाचणी, भारताला धोका?

पाकने घेतली प्रक्षेपणास्राची चाचणी, भारताला धोका?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानने अनेक दशकांनंतर ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे स्वदेशी शिप-लॉँच बॅलेस्टीक प्रक्षेपणास्राची यशस्वी चाचणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिप-लॉँच बॅलेस्टीक मिसाईल ३५० किमीपर्यंत अचूक मारा करु शकते. या खतरनाक मिसाईलला समुद्र आणि जमीन दोन्ही ठिकाणांहून डागता येते. ३५० किलोमीटरच्या पल्ल्यात भारताची अनेक शहरे येत असल्याने भारताला धोका निर्माण झालेला आहे. या प्रक्षेपणास्र चाचण्या पाकिस्तानची सामरिक क्षमता मजबूत करण्यासाठी आणि भारतासोबत लष्करी संतुलन प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. तरीही भारतीय नौदल अशा प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आधी पासूनच सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

शेजारील देश पाकिस्तानने अनेक दशकानंतर स्वदेशी शिप-लॉँच बॅलेस्टीक प्रक्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली आहे. याची मारकक्षमता पाहता भारताचे पश्चिमी क्षेत्र आणि भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संभाव्य धोका बनलेला आहे. हे मिसाईल समुद्रात तैनात केलेल्या जहाजावरुन देखील डागले जाऊ शकते.

पाकिस्तानाची नवीन मिसाईल भारतीय नौदलाची जहाजे, किनारपट्टीला टार्गेट करु शकते. अरबी समुद्रातील भारतीय जहाजे आणि महत्वपूर्ण आर्थिक संपत्तीला धोका उत्पन्न होऊ शकतो. या क्षेपणास्रात अण्वस्र वाहण्याची देखील क्षमता असू शकते. त्यामुळे ही अधिक धोकादायक ठरू शकते. परंतू भारताकडे एस-४०० ट्रायम्फ सारखी अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. जी बॅलेस्टीक मिसाईलना रोखण्यासाठी समर्थ आहे. जर पाकिस्तानने काही धाडस केले तर त्याला इतके मोठे प्रत्युत्तर भारत देईल कि पुढील अनेक वर्षे त्याला जखम लक्षात राहील असे म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR