24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाक-बांगलादेशातील अधिकृत व्यापाराला १९७१ नंतर सुरूवात

पाक-बांगलादेशातील अधिकृत व्यापाराला १९७१ नंतर सुरूवात

कासिम : वृत्तसंस्था
१९७१ च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. बांगलादेशला सरकारने मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानमधील कासिम बंदरातून पहिल्यांदा मालवाहतूक रवाना होणे हे ऐतिहासिक पाऊल आहे पाकिस्तानसोबतचा हा नवीन व्यापार करार आणि आयएसआयची सक्रियता यामुळे बांगलादेशमध्ये भारताच्या सुरक्षेसाठी नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस पाकिस्तानशी जवळचे संबंध प्रस्थापित करत असताना दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये हा एक नवीन अध्याय म्हणून पाहिला जात आहे. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून ५० हजार टन तांदूळ बांगलादेशाला निर्यात करण्याचा करार पाकिस्तानने केला आहे. या कराराला फेब्रुवारीच्या सुरुवातीला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. दोन टप्प्यात तांदळाची खेप बांगलादेशला पाठवली जाईल.

२५ हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशासाठी रवाना झाली आहे तर दुसरी खेप मार्च महिन्याच्या सुरूवातीला पाठवली जाईल. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सरकारी मान्यतेने पाकिस्तानी नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे एक जहाज बांगलादेशच्या बंदरावर पोहचेल. या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेश लष्कराच्या एका उच्चपदस्थ जनरलने पाकिस्तानला भेट दिली जिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद आसिफ मुनीर आणि इतर लष्करी अधिका-यांची भेट घेतली. यानंतर लगेचच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या अधिका-यांनीही बांगलादेशला भेट दिली ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ झाले.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशमधील १९७१ पूर्वीच्या मोक्याच्या ठिकाणांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या शेजारील राज्यांमधील दहशतवाद्यांना मदत करणे आणि भारताला अस्थिर करण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR