23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरमध्ये चिमुकलीवर अत्याचार

पालघरमध्ये चिमुकलीवर अत्याचार

पालघर : प्रतिनिधी
बदलापूरची घटना ताजी असतानाच आता पालघरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे, जव्हारमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
भाडेकरू म्हणून राहणा-या नराधमानेच या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलत्कार करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. भाडेकरू म्हणून राहणा-या आरोपीनेच चिमुरडीवर अत्याचार केला. या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर भाडेकरू म्हणून राहणारे चारही परप्रांतीय फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR