24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeलातूरपिंपळफाटा रेणापूर येथे शेतक-यांचा रस्ता रोको

पिंपळफाटा रेणापूर येथे शेतक-यांचा रस्ता रोको

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला असुन  दुष्काळ अनुदान यादी प्रमाणे केवायसी करण्यात आली आहे. केवायसी करून  दोन  महिने लोटले तरी ७० टक्के शेतक-यांना अनुदान अद्याप मिळाले नाही यासह अन्य मागण्यांसाठी सोमवार दि . १० रोजी ंिपपळफाटा रेणापूर येथे लातूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली एक तास रस्ता रोको करून मागण्याचे निवेदन नायब तहसिल श्रावण उगले यांना देण्यात आले.
रेणापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहीर झाला आहे मात्र दुष्काळ अनुदान यादी प्रमाणे केवायसी करण्यात आले आहे. दोन महिने लोटले तरी ७० शेतक-यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही . तसेच शेतक-यांना अनुदान का मिळाले नाही याची कारणे तहसीलदारने लेखी द्यावी बँक केवायसी करूनही पैसे का पडत नाहीत त्यासाठी संबंधीत बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांची मींिटग बोलवावी व रेणापूर तालुका संपूर्ण पिक विमा हेक्टरी ५० हजार रुपाये प्रमाणे  जाहीर करावा या मागणीचे निवेदन दि ३१ मे रोजी देण्यात आले होते. या मागण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा  शेतकरी संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला होता.
सोमवार दि. १० जून रोजी  ंिपपळफाटा रेणापूर येथे  रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन निकम पाटील, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारी ,तालुका उपाध्यक्ष अच्युत करमुडे, संपर्कप्रमुख दत्ताजी शिंगडे, शेतकरी व्यंकट भानुदास बोळंगे, अजित आगरकर ,त्रिमुक कुसंगे, केशव माने, राजू तिडके, बालाजी तिडके, इलाई शेख, विठ्ठल माने, कारेपूर प्रभु नागरगोजे, प्रकाश  कोराटे, ज्ञानोबा मेटे ,शंकर पवार, चंद्रकांत जोशी, बंडू विषय, अनिल रांजणे, बाळू गोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR