24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणा-या ससुनच्या दोन डॉक्टरांना अटक

पुणे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणा-या ससुनच्या दोन डॉक्टरांना अटक

पुणे : पुणे येथील कल्याणीनगर मधील अपघात प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बणले असून, या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन जणांला चिरडले होते, यात त्यांचा मुत्यू झाला होता. आज या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली असून, आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. यावेळी त्याच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेतली होती, मात्र हे रक्ताचे नमुने तीन लाख रूपयाची लाच घेऊन बदलण्यात आल्याच्या आरोपाखाली दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली आहे. हा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीची पोलिसांनी सकाळच्या वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालयामध्ये ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पल घेतले. परंतु त्यांनी हे सॅम्पल बदलल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
दरम्यान, आरोपीचे रक्तच बदलल्यामुळे आरोपी अपघात झाला त्यावेळी दारू पिलेला नव्हाता असे न्यायालयात शिध्द करण्यात आले असते, यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असते. मात्र, पोलिसांनी दुस-यांदा घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यामुळे हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले- आमदार धंगेकर

दरम्यान, ससुनमधील दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर या प्रकरणावर राण पेटवणारे कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्ट करून अनेक गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले की, तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते, तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. ते हळू हळू जगासमोर येईल,
असे धंगेकर म्हणाले. दरम्यान, आरोपींचे वडिल विशाल अग्रवाल यांनी डॉ. अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे.त्यानंतर या दोघांनी अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, या साठी रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केला होता, असे तपासातून समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR