26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात एसटी बसची कारला भीषण धडक

पुण्यात एसटी बसची कारला भीषण धडक

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात एसटी बसने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यात बोपोडी येथे एसटी बसने दुचाकी आणि कारला धडक दिली. या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत. तर एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. खडकी भागात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एसटी बसने कारला जोराची धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. २५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. नागपूरवरून अकोल्याला बस निघाली होती. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली. शिवशाही बसच्या या अपघातात २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याची माहिती समजते. अमरावती- नागपूर महामार्गावर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. शिवशाही बसच्या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या असून नागपूर-मुंबई महामार्ग एका बाजूने बंद झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR