19.1 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात मतदार जागृती मोहीम

पुण्यात मतदार जागृती मोहीम

पुणे : प्रतिनिधी
मतदार जागृती मोहीम, पथनाट्य, पदयात्रा, रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराची सांगता झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती याबरोबर मनसे आणि अन्य अपक्ष व बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

तसेच आम्ही निवडणुकीनंतर सत्तेवर येणार असा दावा करीत असतानाच परस्परांवर टीका करण्यात आली आहे याखेरीज प्रशासनाच्या बरोबरीने काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जाणीवपूर्वक उपक्रम हाती घेण्यात आले. मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारी पथनाट्ये तसेच पत्रके आणि प्रत्यक्ष संवाद यावर भर देण्यात आला आहे.

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्यात अभियान हाती घेण्यात आले असल्याचे अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी यांनी पत्रकारांना सांगितले. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आग्रहाने सांगितले. आजवरची मतदानाची टक्केवारी पहिली तर ही टक्केवारी ५० ते ६० टक्के अथवा त्यापुढे थोडे होते आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत देश समर्थ होण्यासाठी शंभर टक्के मतदान झाले पाहिजे.यासाठी आमच्या वतीने समाज जागृती ही प्रथमच करण्यात येत आहे. काही शक्ती अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून वेळीच जागरूक राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

ग्राहक पेठ, ग्राहक पंचायत आणि घे भरारी यांच्या संयुक्त विद्यमाने देखील मतदानाच्या टक्केवारी वाढण्यासाठी बुधवारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी शहरातील चार विधानसभा मतदारसंघांत विशेष उपक्रम करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत देखील असा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या त्या मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत मतदान करणा-­या नागरिकांना अल्पोपहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी हा त्यामागचा उद्देश आहे.
तसेच शहर आणि परिसरात सहकारी गृहरचना संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR