29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण : द्विवेदी

पुण्यात मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण : द्विवेदी

पुणे : पुणे जिल्ह्यात तिस-या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्या दृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितली.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत.

बारामती विधानसभा मतदारंसघात ३८० मतदान केंद्र, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोर एकूण ५६१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्र आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७, इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदार संघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR