26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात हेलिकॉप्टर अपघात; चौघे जण रुग्णालयात दाखल

पुण्यात हेलिकॉप्टर अपघात; चौघे जण रुग्णालयात दाखल

पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना ही घटना घडली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची माहिती असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुंबईच्या ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. मुंबईतील जुहू येथून विजयवाडाला हे हेलिकॉप्टर चालले होते. पायलट आणि तीन प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते.

एडब्ल्यू १३९ असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. आनंद या हेलिकॉप्टरचे कॅप्टन होते. ते जखमी झाले आहेत. दरम्यान, दिर भाटिया, अमरदीप स्ािंग, एस. पी. राम या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR