24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?

पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी शपथविधी दरम्यान लोकसभेत ‘जय पॅलेस्टाईन’अशी घोषणा दिली होती. त्याचे समर्थन संजय राऊत यांनी केले आहे. पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरू आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी ओवेसी यांचे समर्थन केले.

दरम्यान,लोकसभेत अध्यक्षपद सत्ताधारी तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाते. सदनात ही परंपरा राहिली आहे. आता तर विरोधी पक्ष मजबूत आहे. २४० पेक्षा जास्त खासदार विरोधी पक्षाकडे आहेत. परंतु त्यानंतरही लोकसभेतील परंपरा सत्ताधारी पक्षाने मोडली आहे. त्यामुळे आता विरोधकांना एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाने लोकसभा अध्यक्षाची निवडणूक लादली आहे, असे शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी शपथविधी दरम्यान लोकसभेत ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्याचे समर्थन संजय राऊत यांनी केले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तींवर लोकसभा चालली. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करून नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करून जामीन रद्द करून घेतला, असा आरोप त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR