22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeपेरणीसाठी घाई करू नका; परभणी कृषी विद्यापीठाचा शेतक-यांना सल्ला

पेरणीसाठी घाई करू नका; परभणी कृषी विद्यापीठाचा शेतक-यांना सल्ला

परभणी : प्रतिनिधी
मान्सूनच्या आगनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे. लवकरच पेरणी सुरु करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे परभणीच्या विद्यापीठातील कृषी विभागाने शेतक-यांना पेरणीसंदर्भात आवाहन केले आहे.
प्रत्येक ठिकाणी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतक-यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केला आहे. परभणी कृषी मौसम आणि हवामान विभाग आणि वनामकृवी विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतक-यांना हा सल्ला दिला आहे.

पेरणीची गडबड करू नये
येत्या दोन दिवसांमध्ये राज्यभरातील सर्वच भागांमध्ये मान्सून चांगल्या प्रकारे बरसणार आहे. त्यानंतर परत तीन-चार दिवसांचा खंड पडणार आहे. या खंडानंतर परत चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी काळजी करू नये, जून महिन्यामध्ये यावर्षी सर्वांच्या पेरण्या सर्वांच्या अशा पद्धतीनेच होणार आहेत. आपल्याकडे पाऊस बरसणार आहे, म्हणून आताच शेतक-यांनी पेरणीची गडबड करू नये, आपापल्या भागामध्ये ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

येत्या ५ दिवसात मुसळधार
मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR