18.2 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरपोलिसांच्या २५ पथकांमार्फत अवैध धंद्यांवर कारवाई

पोलिसांच्या २५ पथकांमार्फत अवैध धंद्यांवर कारवाई

लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात दि. २४ सप्टेंबर रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलिस ठाणे स्तरावर ४४ पोलीस अधिकारी, १६३ पोलीस अंमलदारांचे एकूण २५ पथके तयार करून महाराष्ट्र शासनाने विक्री व व्यवसाय साठी प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसालाची विक्री करणा-या दुकाने व पान टप-यावर कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमे अतंर्गत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य गुटखाची अवैध विक्री व्यवसाय करीत असलेल्या आस्थापनावर नमूद  अधिकारी व अमलदारांच्या पथकाने छापेमारी करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला असा एकूण २ लाख ९४ हजार ७९९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करण्याचा संशय असलेले १७ मोठे गोडाऊन, तसेच ज्या इसमावर या अगोदर प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगल्यावरून गुन्हे दाखल झालेले आहेत अशा इसमांचे राहते घर, आस्थापना तपासण्यात आले. सुगंधित पान मसाला व गुटख्याची विक्री करणा-या ५९६ पान टप-यांची तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला मिळून आलेल्या इसमावर एकूण २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत. सदरची कारवाई यानंतरही सुरूच राहणार असून जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR