22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रप्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख

पुणे : प्रतिनिधी
ब-याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगून, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धा परीक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्पप्नांना यशस्वितेचे पंख लावण्याचा संकल्प एमआयटी एडीटीसारख्या अग्रगण्य विद्यापीठाने केला आहे, असे मत एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे (एसआयसीएस) संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केले.

डॉ. धर्मपात्रे पुढे म्हणाले, सनदी सेवा परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी पदवीनंतर ते दिल्ली अथवा अन्य शहरांत लाखोंचा खर्च करून क्लासेस करतात. परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यातील खूपच कमी विद्यार्थ्यांच्या हाती यश लागते. अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन व त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठीच, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये ‘स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’ची स्थापना करण्यात आली.

बारावीनंतर यूपीएससी व राज्यसेवा परीक्षांसह अन्य सरकारी सेवांचा अभ्यास करू पाहणा-या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह बी. ए. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदवी आणि एम. ए. पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देणारी एमआयटी एसआयसीएस ही भारतातील एकमेव अग्रगण्य संस्था आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणार नाहीत, त्यांना इतर खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल. तरी, अधिक माहितीसाठी www.mitsics.edu.in या संकेतस्थळावर अथवा, ९६०७५ ८००४२/५२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR