23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक

प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक

पुणे : प्रतिनिधी
प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या चैतन्य महाराजांना अटक करण्यात आली आहे. हभप चैतन्य महाराजांसह त्यांच्या दोन भावांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांविरोधात तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी आहेत. अटकेच्या कारवाईबाबत विचारले असता चैतन्य महाराज यांनी सांगितले की, पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्हाला ताब्यात घेतले व सोडून दिले. चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवून बदनामी करणा-यांवर मी कायदेशीर कार्यवाही करणार नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चैतन्य महाराज यांच्या घरापासून जवळ एक कंपनी आहे. त्या कंपनीचा रस्ता पोकलेनने खोदला. या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शेजारीच असलेल्या कंपनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद आहेत. याच वादातून त्यांनी रात्री त्यांच्या दोन भावांसह रस्ता बेकायदेशीरपणे खोदला या अरोपावरून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ही अटक केली गेली. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचे म्हटले आहे.

चैतन्य महाराज म्हाळुंगे परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदल्याचा आरोप आहे. याचा सीसीटीव्ही व्हीडीओ समोर आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तिघांना आधी ताब्यात घेण्यात आल्े होते, नंतर अटकही केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR