निलंगा : प्रतिनिधी
देशमुख-निलंगेकर कुटुंबातील दुवा हरवला, बहुआयामी, अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले दयानंद चोपणे यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच अतिशय दु:ख झाले असल्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या.
निलंगा येथील प्रा. दयानंद चोपणे यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, निलंगेकर कुटुंबावर अतिशय प्रेम करणारे, पाठराखण करणारे तसेच देशमुख कुटुंबावरही प्रेम करणारे चोपणे यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. असा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, माझा बालमित्र हरवला. या मित्राची जागा कोणीच भरून घेऊ शकत नाही असे व्यक्तिमत्व आज पडद्याआड गेले आहे. याचे मला अतिव दु:ख झाले आहे असे ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ शरद पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, डॉ. अरंिवंद भातंबरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंंगाडे, अविनाश रेशमे, माजी जि .प .अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पंडितराव धुमाळ, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती गोंिवद शिंगाडे,माजी नगराध्यक्ष अॅड. वीरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, चक्रधर शेळके, पंकज शेळके, रोहित बनसोडे, शिवसेना नेते ईश्वर पाटील, संजय हलगरकर, सुधाकर पाटील, अंबादास जाधव, चक्रधर शेळके, सिराज देशमुख, रवी फुलारी, सुधाकर पाटील अदीसह शहरातील तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.