लातूर : सिध्देश्वर दाताळ
प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत आज मोठ्या उत्साहात श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने लातूरनगरी विद्यूत रोषणाईने सजली आहे. जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण शहर विद्यूत रोषणाईसह भगव्या पताक्यांनी उजळून निघाले आहे. जिल्हाभरात दिवाळी साजरी केली जात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राम भक्त्तांच्या आनंदाला उधान आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निरमान झाले आहे. यानिमित्ताने शहरात फटाका बाजार फुलला आहे.
फटाक्यांची मागणी वाढल्याने फटाक्यांच्या किंमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रीराम यांच्या मुर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने लातूर शहरात गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी केली जात आहे. त्याबरोबरच शहरात फटाक्याचे स्टॉल लावण्यात आले आहे. या स्टॉलवर राम भक्ताकडून मोठया प्रमाणात फटाक्याची खरेदी केली जात असल्याचे दिसून आले आहे. दिवाळी सारखेच या सणालाही फटाक्यांच्या खरेदीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे यावर्षी फटाक्यांच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरी देखील बाजारात फटक्यांच्या खरेदीसाठी राम भक्त्तांची झुंबड उडाली आहे.
सर्वच शहरात मोठया प्रमाणावर फटाके खरेदी सुरु आहे. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यत सर्वच फटाक्यांच्या दुकानांत एकच गर्दी करत आहेत. फटाक्यांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी महागल्या असल्या तरी शहरात फटाका बाजार गजबजले आहे. ग्राहकांकडून किंमतीचा विचार न करता उत्साहात खरेदी सुरु आहे. शहरातील फटाका बाजारात सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, बॉम्ब, रॉकेट, लड, झाड, मल्टी शॉट या पारंपरिक फटाक्यांसह बाजार फुलला आहे. फटाका बाजारात मल्टी शॉट आवज २४० रुपयापासून ते ४०० रुपयापर्यंत तर इको १६०० ते २००० रुपये पेटी, १००० नग असलेले लड २५० पासून ४०० पर्यंत तसेच झाड १०० ते २००० पर्यंत, बॉम ६० ते १०० रूपयेपर्यंत विक्रीस आले असल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत कमटाने यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे.
श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त लातूर शहरातील सर्वच मंदीरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सूरु आहे. तसेच सार्वजनिक स्वरुपातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने फुलांना मोठी मागणी वाढली आ.हे. गुलाब, मोगरा, झेंडू, शेवंती, डच रोज, निशिगंधा आदी फुलांना मागणी वाढली आहे. फुलांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने फुलांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे फुल विक्रेते गौस फुलारी यांनी सांगीतले.