28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याफडणवीसांचा रेकॉर्ड, अजित पवारांचा विक्रम

फडणवीसांचा रेकॉर्ड, अजित पवारांचा विक्रम

आजच्या शपथविधीनंतर रचला जाणार इतिहास

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा भाजप-महायुती सरकार सत्तेत येत आहे. आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. आजच्या शपथविधीनंतर दोन नवे रेकॉर्ड नोंदवले जाणार आहेत.

राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस तिस-यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. २०१४ ला देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०१९ ला त्यांनी पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार औटघटकेचं ठरलं. २०२२ ला पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानंतर शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली.

आता २०२४ ला देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत उपमुख्यमंत्री असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झालेली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील, तेव्हा उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०१० ते २०१२ या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री राहिले. २०१२ ते २०१४ या काळात अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. तर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे सरकार केवळ औट घटकेचं ठरलं. काहीच तासात हे सरकार कोसळलं. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. यावेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पुढे २०२३ ला अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत अजित पवार यांनी सहावेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भुषवलेलं आहे. त्यामुळे सहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR