27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचीही एसआयटी चौकशी करा

फडणवीसांचीही एसआयटी चौकशी करा

नाना पटोलेंची मागणी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या घणाघाती आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजप आमदारांनी जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी एसआयटी गठित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारविरोधात आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांचीही एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे फडणवीसांचीही एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने मनोज जरांगेंसोबत चर्चा करत होते. या चर्चेचा तपशील त्यांनी सार्वजनिक करायला हवा, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवून दिली. ‘मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा कट देवेंद्र फडणवीसांनी रचला होता. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी तुमच्या सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा,’ असे जरांगे यांनी म्हटले होते. तसेच मला बदनाम करण्यासाठी माझ्या जवळच्या लोकांनाच देवेंद्र फडणवीस मुंबईला बोलवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR