25.9 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्रफ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट, कामगाराचा मृत्यू

फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट, कामगाराचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर एका भंगार दुकानात जुन्या फ्रिजचा कॉम्प्रेसर काढत असताना त्याचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मालकासह तिघे जखमी झाले आहेत.

दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत येथे पाण्याचा मारा केला. महंमद शेख (वय ४९) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर मालक महंमद सय्यद यांच्यासह किशोर साळवे आणि दिलीप मिसाळ हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस संबंधित घटनेची चौकशी करत आहेत.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बी. टी. कवडे रस्ता परिसरात नवशा गणपतीपुढे भंगार मालाचे मोठे दुकान आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल आहे. भंगारमध्ये जुने फ्रिज आले होते. ते खोलण्यात येत होते. कामगार महंमद शेख हे फ्रिजचे कॉम्प्रेसर काढत होते. तर इतर तिघे जवळ गप्पा मारत बसले होते. दरम्यान कॉम्प्रेसरमध्ये असलेल्या गॅसचा अचानक स्फोट झाला. कॉम्प्रेसर उडून महंमद यांना लागले. त्यात ते गंभीर जखमी झाले. तर इतर वस्तू उडून इतरांना लागल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR