17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरबनावट दिव्यांग प्रमाणपत्राआधारे जलील पठाणने मिळवली पदोन्नती!

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राआधारे जलील पठाणने मिळवली पदोन्नती!

लातूर : विनोद उगीले
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफु टी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत पोहचल्याने लातूरचे नाव पुन्हा एकदा देशभरात चर्चेला आले आहे. नीट पेपरफु टी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात लातूर तालुक्यातील कातपूर शाळेत मुख्याद्यापक असलेल्या व पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या संशयीत आरोपी जलीलखाँ उमरखा पठाण याने मुख्याद्यापक पदोन्नती बनावट दिव्यांग प्रमाणपत्रा अधारे मिळवल्याचे समोर येत आहे. तसेच त्याने  फसवेगीरीतून कमावलेल्या मायेतून लातूर व उदगीरात मोठी गंतवणूक केल्याचे ही समोर येत आहे.
देशभरातील बहुचर्चित नीट पेपरफु टी प्रकरणात लातूरात गुन्हे दाखल झाल्याने लातूर पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहे. असे असतानाच या गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेल्या व सध्या पोलीस कोठडीची हवा खात असलेला जलीलखाँ उमरखा पठाण हा मुळातच फ्र ॉड असल्याचे समोर येत आहे. तो कर्णबधीर नसताना ही त्याने बनावट कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र मिळवले असून त्याने या बनावट कर्णबधीर प्रमाणपत्रा अधारे मुख्याद्यापक पदी पदोन्नती मिळवल्याचे ही समोर येत आहे.
 या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे दि. १८ फेब्रवारी २०२३ रोजी अधुनिक लहुजी सेना या संघटनेने रितसर तक्रार देऊन बनावट कर्णबधीर प्रमाणपत्रा अधारे मुख्याद्यापक पदी पदोन्नती मिळवणा-या जलीलखाँ उमरखा पठाण याचेवर कारवाई करावी अशी मागणी ही केली आहे.  या प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १४ मे २०२४ रोजी सुणावणी ही ठेवली होती. यासंदर्भात जलीलखाँ उमरखा पठाण याला शिक्षण विभागामार्फत दि. ९ मे २०२४ रोजी नोटीस बजावून सुणावणीस हजर राहण्या संर्दभात ताकीद ही देण्यात आली होती. मात्र या सुणावणीचे पुढे काय झाले याच बरोबर याप्रकरणाचा निकाल हा अद्याप गुलदस्तयात असून संबधित शिक्षण विभाग मात्र याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळत आहे.
 असे असतानाच पेपरफु टी प्रकरणातील संशयीत आरोपी व बनावट कर्णबधीर प्रमाणपत्रा अधारे मुख्याद्यापक पदी पदोन्नती मिळवणा-या जलीलखाँ उमरखा पठाण याने फसवेगीरीतून कमावलेल्या मायेतून लातूर व उदगीरात मोठी गंतवणूक केल्याचे ही समोर येत आहे. याचा शोध घेतला असता उदगीर जळकोट महामार्गावरील जळकोट नाक्यावर या महाशयांनी १६०० स्केवरफु ट जागेत कोट्यावधी रूपयाची गुंतवणूक करून टोले जंग इमारत उभी केली असून लातूरात ही त्याने मोठी अर्थिक गुंतवणूक केली असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR