नागपूर : जिल्ह्यात बर्ड फ्लूने दहशत निर्माण केली आहे. हा आजार पसरू नये म्हणून प्रशासनाने कित्येक कोंबड्या नष्ट केल्या. या कोंबड्यांना मारणा-यांची चाचणी करण्यात आली. त्यांना बर्ड फ्लू तर झाला नाही ना, हे तपासण्यात आले.
पण त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. कारण त्यांना बर्ड फ्लू नाही पण कोरोना झाला होता.
नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रांमध्ये काही दिवसांपूर्वी कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं समोर आलं होतं. कोंबड्यांना मारण्यासाठी आणि नंतर संपूर्ण केंद्र सॅनिटाईज करण्यासाठी ८९ कर्मचा-यांना पाठवण्यात आले होते. या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राच्या एक किलोमीटर त्रिज्येतील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहेत.
दरम्यान या कोंबड्यांना नष्ट करणा-या कर्मचा-यांची बर्ड फ्लू चाचणी करण्यात आली. एकालाही बर्ड फ्लूची लागण झाली नव्हती. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण दोन कर्मचा-यांचे रिपोर्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यांना बर्ड फ्लू नाही तर कोरोना झाला आहे.