18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयबलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत सुप्रीम चिंता

बलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत सुप्रीम चिंता

पुरुषाला अपराधी घोषित करण्याचा ट्रेंड चिंताजनक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली असून, संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याचा वाढत चाललेला ट्रेंड चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. महिला जोडीदाराने विरोध न करता किंवा लग्नासाठी आग्रह न करता दीर्घ काळपर्यंत लैंगिक संबंध ठेवणे संमतीने निर्माण झालेल्या नात्याचे संकेत आहेत, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने संमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधानंतर पुरुष जोडीदाराला दोषी ठरवण्याची वाढत असलेली प्रवृत्ती चिंताजनक आहे. संमतीने दीर्घ काळ चाललेले लैंगिक संबंध काही कारणांनी तुटले तर न्यायाचा दाखला देत पुरुषाला अपराधी घोषित करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणातील आरोपी समाजिक कार्यकर्ता आहे. आरोपीने तक्रारदार महिलेच्या मोठ्या मुलीचे अपहरण झाले, तेव्हा तिच्या सुटकेसाठी मदत केली होती. यानंतर तक्रारदार महिला सातत्याने आरोपीच्या कार्यालयात जाऊ लागली आणि त्याला त्याच्या कामात मदत करू लागली. यासाठी आरोपी तक्रारदार महिलेला अर्थिक मदतही करायचा. दरम्यान, आरोपीने केलेल्या दाव्यानुसार तक्रारदार महिला आरोपीकडे सातत्याने आर्थिक मदत मागू लागली, तेव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तक्रारदार महिला आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना धमकी द्यायला लागली. तेव्हा आरोपीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतरही या महिलेने आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR