22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
HomeUncategorizedबांसवाड्यात आढळली सोन्याची खाण!

बांसवाड्यात आढळली सोन्याची खाण!

बांसवाडा (वृत्तसंस्था) : राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली. महत्वाचे म्हणजे, ही खाण नजीकच्या भविष्यात देशाच्या २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल.

सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा वाटप करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला परवाना मिळाला आहे.

तर इतर ब्लॉक कांकरिया गारा गोल्डच्या कंपोझिट परवान्यासाठी ५ कंपन्या स्पर्धेमध्ये आहेत. यात मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नेच्युरल रिसोर्सेस लिमिटेड, रतलामची ओवेस मेटल अँड मिनरल्स प्रोसेस्ािंग लिमिटेड, उदयपूरची हिंदुस्तान झ्ािंक आणि कानपूरच्या जेके सीमेंट लिमिटेडचा समावेश आहे.

या सोन्याच्या खाणीतून इतरही अनेक खनिजे काढले जातील. यामुळे या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महत्वाचे म्हणजे, या भागात ९४०.२६ हेक्टरमध्ये ११३.२ मिलियन टन सुवर्ण भांडार सुरुवातीच्या टप्प्यात सापडू शकतो. यात जवळफास २२२.३९ टन सुवर्ण धातू असण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR