20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरबाजारात भाजीपाल्याचे दरात घसरण

बाजारात भाजीपाल्याचे दरात घसरण

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत गत दोन अठवडयापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे. भाव कमी असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील भाजीपाल्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या पालेभाज्यांच्या जुडीची १० ते २० रुपयांपर्यंत उतरले आहेत. या पालेभाज्यांची जुडी काही दिवसापूर्वी ५० ते ६० रुपयाने विक्री होत होती. सध्या पोषक वातावरण आणि वाढत असलेली आवक यामुळे मेथी, पालक, शेपू या पालेभाज्यांच्या जुडीचे भाव आवाक्यात आले आहेत. यामुळे पालेभाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पालेभाज्यांचे भाव चांगलेच वाढले होते. त्यामुळे पालेभाज्यांचे खरेदी कमी झाली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यासह शेजार जिल्ह्यातून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर खाली आले आहेत.
 मेथी, पालक, शेपू, कांदा पात या भाज्या १० रुपयांना मिळत आहेत. याबरोबरच इतर पालेभाज्यांना ग्राहकांकडून मागणीही वाढली आहे. पालेभाज्यांबरोबर भाज्यांचेही भाव उतरत आहेत. वांगे, भेंडी, कोबी, वरणा, काकडी, भोपळा यासह अन्य कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे ३० ते ४० रुपये प्रतिकिलोच्या दरात आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचे भावही आटोक्यात आले असल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे. भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र टोमॅटो, गवार याचे दर अद्याप उतरले नाहीत. त्यामुळे या भाज्यांची कमी प्रमाणात खरेदी ग्राहकांकडून होत आहे. याशिवाय कांद्याचे भावही उतरले असून १०० रुपयांना चार किलो, या दराने बाजारात मिळत आहेत.
शहरातील कृषी उत्पन्न बाजारात शेतमालाची आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याला चागला दर मिळाला होता. कोंिथबीर, मेथी, काकडी, मिरची, दोडका आदी पालेभाज्या ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने, त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महात्मा फुले बाजार समितीत महिन्यांपूर्वी पालेभाज्यांने तब्बल ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असा उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे.
मागील काही महिन्यांत भाज्यांचे दर वधारलेले पाहायला मिळत होते. भाज्यांच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत होती. मात्र सध्या लातूर जिल्ह्यात भाज्याचे दर कमी झालेले आहेत. भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना थंडीत वेगवेगळया भाज्यांचा आस्वाद घेता येत आहे. स्वयंपाकातील फोडणीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लसणाचा भाव मात्र तेजीतच आहे. शहरातील बाजारात लसणाचा भाव ४०० रुपये किलो इतका होता. गेल्या अनेक दिवसांपासून लसणाचे भाव वाढले असून पुढील काहि दिवस लसनाचे भाव तेजीत राहतील असे, व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR