22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार

बुलडाण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार

बुलडाणा : जळगाव जामोद -बु-हाणपूर मार्गावरील मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कठडा नसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघात अवघ्या सहा तासात दोन अपघात होऊन यात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतातील कामे आटपुन घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर, तर दुसरा ५० फुट खोल पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील येरळी येथे घडली. तर याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ अशाच प्रकारच्या कठडा नसलेल्या पुलावरून दुचाकी नदीत कोसळल्याने एकजण जागीच ठार झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून जळगाव जामोद-बु-हाणपूर मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलांना संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. याच पुलावर संरक्षक कठडा नसल्याने तीन युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रविवार दुपारी दोन वाजताच्या सुमारास आपल्या शेतीची कामे आटपून धनंजय मुकुंद (२६ रा. येरळी) आणि विलास जुनारे (२७, रा.येरळी) हे घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांची गाडी जळगाव-जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर आली असता या रस्त्यावर असलेला खड्यातून उसळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR